सांगलीच्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने, मध्यप्रदेशचे ग्रामीण विकास मंत्री प्रल्हादसिंह पटेल सांगली दौऱ्यावर!.--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मध्यप्रदेशचे ग्रामीणविकास मंत्री श्री प्रल्हादसिंह पटेल हे सांगली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर येत आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने,भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर पक्षाचे विविध नेते,देशातील वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाचा प्रवास करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून माजी केंद्रीय मंत्री व सध्याच्या मध्यप्रदेश भाजप सरकारमधील पंचायत ग्रामीणविकास श्रम कॅबिनेट मंत्री श्री प्रल्हाद सिंह पटेल हे शुक्रवार दि.23 रोजी सांगली लोकसभा प्रवास दौऱ्यावर येणार आहेत.          

यावेळी संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीबरोबर,  सकाळी १०.३० वाजता हरिपूर रोड सांगली येथील सुखरूप लॉन येथे भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर व सांगली ग्रामीण जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते विविध आघाड्यांचे पदाधिकारी युवा मोर्चा महिला मोर्चा कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे यावेळी त्यांच्याबरोबर लोकसभा क्लस्टर प्रमुख श्री प्रशांत परिचारक हे उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे,खासदार संजय काका पाटील,आमदार सुधीर दादा गाडगीळ,आमदार गोपीचंद पडळकर,दीपक बाबा शिंदे,संघटन मंत्री मकरंद देशपांडे,सांगली लोकसभा संयोजक शेखर इनामदार,माजी आमदार दिनकर तात्या पाटील,नितीन राजे शिंदे,विलासराव जगताप,नीता ताई केळकर,यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.तरी या मेळाव्यास सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व निशिकांत दादा भोसले पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top