जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
गोविंदराव शिंदे नागेलीकर,अध्यक्ष,नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी.
नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील बैठकीस प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने निरीक्षक म्हणून मा.श्री.शिवाजीराव मोघे मराठवाडा प्रभारी,मा.श्री.अनिल पटेल प्रदेश सरचिटणीस,माजी खा.मा.श्री.तुकारामजी रेंगे पाटील निरीक्षक,मा.श्री.सिद्धार्थ हत्ती आंबिरे,प्रदेश अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग,मा.श्री.शेख युसुफ शहर अध्यक्ष छ.संभाजीनगर,मा.श्री.मुजाहिद खान प्रदेश सचिव व मा.श्री.ईश्वररावजी भोसीकर नांदेड जिल्हा व शहर समन्वयक.यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा व शहरचा राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील माजी खासदार आजी-माजी आमदार व प्रदेश पदाधिकारी माजी महापौर उपमहापौर मनपा नगरसेवक तालुक्यातील सर्व आजी-माजी नगरसेवक तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष,सभापती सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य सर्व तालुका अध्यक्ष व शहराध्यक्ष,विविध सेलचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीचे ठिकाण :-जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय नवा मोंढा नांदेड.
दि.:- 20 2 2024 वेळ :- सकाळी ठीक 11.30 वाजता.