सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने,मुंबई- पंढरपूर रेल्वे गाडी सांगली मार्गे सातारा पर्यंत धावणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीचे खासदार संजय काकांच्या प्रयत्नाने मुंबई-पंढरपूर रेल्वे गाडी सांगली मार्गे सातारा पर्यत धावणार आहे.मुंबई-पुणे-पंढरपूर-सांगली-मिरज-कराड-सातारा या मार्गावर थेट एक्सप्रेस रेल्वे धावणार आहे.सांगली जिल्हातील वारकरी विठ्ठल भक्तांचे सांगली स्टेशन,भिलवडी किर्लोस्करवाडी,ताकारी येथून थेट पंढरपूर रेल्वे गाडीचे स्वप्न साकार झाले आहे.सांगली जिल्ह्याच्या एका टोकाला दुसऱ्या टोकाशी जोडणारी रेल्वे गाडी मंजूर झाली आहे.संपूर्ण सांगली जिल्हा जोडला गेला आहे.सांगली जिल्हाचा एक टोक जत तालुका व कवठेमहांकाळ तालुका जिल्हाच्या ताकारी येथील दुसऱ्या टोकाशी जोडले जाईल.जत व कवठेमहांकाळ तालुके आता जिल्हा मुख्यालय सांगली स्टेशनशी थेट रेल्वे गाडीने जोडले जातील.सांगली सातारा,सोलापूर जिल्ह्यातील वारकरी विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांची मागणी होती की सांगली,सातारा जिल्हातील विविध रेल्वे स्टेशनवरून पंढरपूर जाणारी रेल्वे गाडी सुरू व्हावी.

या मागणीसाठी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांनी पुढाकार घेऊन गेल्या 10 वर्षात अनेक पत्रव्यवहार केले.तसेच तत्कालिन रेल्वे मंत्रीना भेटून वारकरी विठ्ठल भक्तांसाठी सांगली मार्गे पंढरपूर जाणारी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी संजय काकांनी केली होती.त्यानंतर वेळोवेळी खासदारांनी पाठपुरावा केला होता.ही गाडी सुरू करण्यासाठी ज्या तांत्रीक अडचणी होत्या त्या सोडवण्याबाबत मध्य रेल्वे सलाहगार समितीचे उमेश शाह व झोनल रेल्वे समितीचे सुकुमार पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.

वारकऱ्यांचे गेल्या 75 वर्षांचे स्वप्न आता पुर्ण झाले असून गाडी क्र 11027/11028 दादर(मुंबई)-पंढरपूर गाडीचा विस्तार सांगली स्टेशन मार्गे सातारा पर्यंत करण्यात आला आहे.ही गाडी दादर-मुंबईहून सुटून स्वतःच्या निर्धारित मार्गावरून ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड,पुणे,उरूली,केडगाव,दौंड, भिगवण,जेऊर,केम,कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला येईल. पंढरपूरहून पुढे सांगोला,मसोबा डोंगरगाव,जत रोड,ढालगाव, कवठेमंहांकाळ,मिरज,सांगली,भिलवडी,किर्लोस्करवाडी, ताकारी,कराड,मसूर,कोरेगाव मार्गे साताराला जाईल.साताऱ्याहून परत निघून ही गाडी कोरेगाव,मसूर, कराड,ताकारी,किर्लोस्करवाडी,भिलवडी,सांगली,मिरज, कवठेमहांकाळ,ढालगाव,जत रोड,मसोबा डोंगरगाव,सांगोला, पंढरपूर,कुर्डूवाडी,केम,जेऊर,भिगवण,दौंड,केडगाव,उरुली, पुणे, चिंचवड,तळेगाव,लोणावळा,कल्याण,ठाणे मार्गे दादर(मुंबई) पोहोचेल.सांगली मार्गे मुंबई(दादर)-पंढरपूर-सांगली-सातारा ही गाडी लवकरच सुरु होईल.त्याबाबतचा रेल बोर्डचा अध्यादेश ता.25 जानेवारीला निघाला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top