मधुमेह रुग्णांची अचानक रक्तातील साखरेची पातळी वाढण्याच्या संबंधी कारणमीमांसा व उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 39.


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

रक्तातील साखरेची पातळी (blood suger level) वाढण्याची अनेक कारणे आहेत.योग्य वेळी त्यांची कारणे जाणून घेतल्यास उपचार करण्यास मदत होईल आणि आरोग्याच्या समस्या टाळणेही सोपे होईल.जर तुम्हाला टाइप -2 मधुमेह असेल तर तुम्हाला माहित असेलच की रक्तातील साखरेची पातळी नियंंत्रित ठेवणे किती महत्वाचे आहे.मधुमेह थोडा जरी वाढला तरी हृदयरोग आणि किडनीचे आजार देखील उद्भवू शकतात.अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते,रक्तातील उच्च साखर नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे पण जर रक्तातील साखर अचानक वाढली तर ते हलक्यात घेऊ नका,त्याऐवजी सावधगिरी बाळगा आणि त्याची कारणे शोधा.जेव्हा शरीरात साखरेचे प्रमाण वाढते आणि अन्न खाल्ल्यानंतर वेगाने कमी होते तेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

साखरेचे प्रमाण वाढण्याच्या स्थितीस हायपरग्लाइसीमिया म्हणतात.मधुमेहाची ही धोकादायक परिस्थिती आपल्याला बर्‍याच रोगांना बळी पाडते.म्हणूनच डॉक्टर नेहमीच मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देतात.पण कधी कधी रक्तातील उच्च साखरेने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील साखर अचानक वाढते,जी त्वरित कमी करणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत,रक्तातील साखर अचानक वाढण्यामागची कारणं जाणून घेतल्यास आपल्याला त्यांचे नियंत्रण करणं देखील सोपं होतं.यामुळे आपण आरोग्याच्या अनेक समस्या टाळू शकतो.ब्लड शुगर वाढण्यामागची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे!

1) व्यायामाची खूप कमतरता.

आपल्या रूटीनमध्ये हलके फुलके व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी चालणे, घरकाम यासारख्या शारीरिक क्रिया करणं चांगलं असतं. जेव्हा आपण नियमितपणे हालचाल करणार नाही किंवा चालणार-फिरणार नाही तेव्हा रक्तातील ग्लूकोजची पातळी कधी वाढेल हे तुम्हालाही कळणार नाही. पण जास्त कठोर व्यायामामुळे देखील आपल्या रक्तातील साखर अचानक वाढू शकते. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण व्यायाम करू नये. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या उपचार योजनेत काय बदल केले पाहिजे याबद्दल आपल्या डॉक्टरांशी देखील संवाद साधा.

2) आहार देखील असतो जबाबदार.

जर रक्तातील साखरेत अचानक वाढ होण्याची परिस्थिती कायम राहिली तर ती चिंतेची बाब ठरू शकते. यासाठी आपण काय खात आहोत हे सर्वप्रथम पडताळून पहा. याव्यतिरिक्त आपण घेत असलेल्या आहारात साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असेल तरीही ब्लड शुगरमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे. शक्यतो फळांमध्ये केळीचे सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात व्होल व्हीट ब्रेड (whole wheat bread), प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थ (unprocessed food), ब्राउन राइस (brown rice), फळे (fruits) आणि भाज्या (vegetable) यांचा समावेश करावा. खाद्यपदार्थांमध्ये जास्तीत जास्त फायबरचा समावेश केल्याने रक्तातील साखर अचानक वाढण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते.

3) खूप कमी झोप घेणे.

रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होण्यासाठी झोप कमी घेणे हे कारणही जबाबदार असते. एका अभ्यासामध्ये संशोधकांनी 6 दिवसात लोकांना फक्त 4 तास झोपण्याची परवानगी दिली. शेवटी असे दिसून आले की कमी झोप घेतल्यामुळे या लोकांमध्ये ग्लुकोजची पातळी ४० टक्के कमी होती. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की जेव्हा आपण गाढ झोपी जाता तेव्हा तुमची मज्जासंस्था मंदावते आणि मेंदू कमी ब्लड शुगरचा वापर करायला लागतो. म्हणून झोपेसाठी एक निश्चित वेळापत्रकाचा अवलंब करा. झोपेण्याच्या आधी फोन किंवा लॅपटॉपचा वापर करु नका आणि झोपायच्या आधी स्वत:ला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करा.

४) चुकीची औषधं घेणं.

आपल्याला माहित आहे की इन्सुलिन आपल्या रक्तातील साखर कमी करू शकतो. पण एक चुकीचा डोस देखील आपली बल्ड शुगर वाढ करू शकतो. रक्तातील साखर कमी करण्यासाठी कार्टिकोस्टेरॉइडसारखी औषधं उपयोगी मानली जातात. याव्यतिरिक्त तुम्ही वॉटर पिल्स, डिप्रेशन ट्रीटमेंटची औषधे आणि रक्तदाबाची औषधे घेत असाल तर रक्तातील साखर कधी वाढेल हे तुम्हालाही कळणार नाही.

५) ब्रश न करणे व धुम्रपान करणं.

मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हिरड्यांची समस्या खूप लवकर उद्भवते.जर समस्या गंभीर असेल तर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे आणखीनच कठीण होईल.सर्व संक्रमणांप्रमाणेच हे आपल्या ग्लुकोजच्या वाढीचे कारण असू शकते.म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांनी दिवसातून दोनदा ब्रश करावा आणि इतकंच नव्हे तर रोज अँटीसेप्टिक माउथवॉशने गुळण्या देखील कराव्यात. लक्षात ठेवा, धूम्रपान केल्याने मधुमेह वाढू शकतो.जर तुम्ही आधीपासूनच मधुमेहाने ग्रस्त असाल तर रक्तातील साखर नियंत्रित करणे इतके सोपे नाही.धूम्रपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी खाली आणणे कठीण होते.म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ताबडतोब ते थांबवा.

सदरहू लेख आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री. संतोष सावंत सर यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top