जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जिये कटापूर योजनेतून,राजेवाडी तलाव भरुन देण्यात यावा,अशी मागणीखासदार संजयकाका पाटील यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीमध्ये सध्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवत आहे. आटपाडी तालुक्यातील ही परिस्थिती भिषण असलेने जिये कटापूर सिंचन योजनेतून आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलाव भरुन देण्यात यावा,अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार जिये कटापूर सिंचन योजनेतून आंधळी धरणामध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे.हेच पाणी जर आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावात सोडून हा तलाव भरुन घेतल्यास येथील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणेस मदत होणार आहे.या मागणीस अनुसरुन उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसोबत सकारात्मक चर्चा झाली व याबद्दल ग्वाही दिली.
यावेळी आटपाडी प.स सभापती हर्षवर्धन देशमुख,भाजप प. महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजप तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा प्रमूख प्रभाकर पाटील,अमोल काटकर,अंकुश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.