मधुमेही रुग्णांना आवश्यक असलेल्या," HBA1c तपासणी विषयी"अत्यंत उपयुक्त माहिती.!--

0

 आरोग्य भाग- 41.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मधुमेही रुग्णांना HBA1c  तपासणी करणे काळाची गरज असल्याचे आता दिसून येत आहे. ग्लुकोस ची मात्रा % मध्ये काढणे खूप महत्त्वाची आहे. 

HBA1c  ची तपासणी केल्यानंतर आपली शुगर 5.7 % पेक्षा कमी असेल तर आपण सुरक्षित आहात.आणि जर आपली शुगर ची मात्रा 5.7 ते 6.4 असेल तर आपल्याला मधुमेह होण्याच्या आधीची ही क्रिया सुरू झाली आहे.आणि जर आपली शुगर 6.8% च्या वर असेल तर निष्टित आपण मधुमेही रुग्ण आहात हे कळते.

आपण मधुमेह आजारामध्ये नेहमी औषधे उपचार करतो.लाखो पैसे खर्च करून शुगर ची मात्रा नियंत्रणात आहे की नाही याची कल्पना HBA1c तपासणी द्वारे कळते आणि मधुमेह होण्याच्या आधी ही तपासणी तुम्हाला सांगते की तुम्हाला भविष्यात शुगर विषयी आधीच पूर्वकल्पना देण्यास मदत करते,आणि शुगर आहे की नाही?ही उत्तम निर्णनायक माहिती ह्या तपासणी द्वारे कळते. 

 उदारणार्थ...

 आपल्याला शुगर आहे आणि त्यांची 6.8% शुगर मात्रा आहे,आणि सलग औषधापचार तीन महिने करून शुगर 6.8% पेक्षा कमी झाली असेल तर तुमचा आहार विहार आणि मेडिसिन उत्तम आहे हे मात्र HBA1c ची तपासणी केल्या शिवाय शुगर ची मात्रा कमी झाली की जास्त झाली हे माहीत करणे अतिशय महत्वाचे आहे.म्हणजे आपण घेतलेला औषधेउपाचार व्यवस्थित आहे की नाही हे या तपासणी द्वारे कळते.नाहीतर तर आपण तपासणी च्या आधारे उत्तम औषधे उपचार आणि खानपान नियंत्रणात ठेवून उत्तम प्रकारे शुगर नियंत्रणात राहू शकते,त्यामुळे आपण मधुमेह रुग्णांनी न चुकता सलग तीन महिन्याला HBA1c ची तपासणी करून खात्री करून घ्यावी की, आपण योग्य रित्या उपचार घेत आहोत की नाही?.

सदरहू लेखातील मधुमेह रुग्णांना आवश्यक असलेल्या HBA1c तपासणी विषयीची माहिती,योग्य त्या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली व सल्ल्याने करण्यात यावी.

सदरहू लेख आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनचे श्री. संतोष सावंत सर यांचे कडून संपादन करून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top