जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
मुंबई येथील मुख्य पोस्ट मास्तर जनरल मुंबई यांच्या कार्यालयामध्ये,दि.19 मार्च 2024 रोजी दुपारी 3:00 वाजता 126 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून,महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित असलेल्या पोस्टाच्या सेवेच्या कामकाजाविषयी तक्रारीचे निवारण करण्यासाठी,सदरहु डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती,कोल्हापूर डाक विभागाचे प्रवर अधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित असलेल्या पोस्टाच्या कार्यालयाकडून आपल्या तक्रारीचे निरसन 6 आठवड्याच्या आत झाले नसेल तर,अशा तक्रारीचे निरसन डाक अदालती मध्ये करण्यात येते.यामध्ये टपालने पाठवलेल्या वस्तू, मनीऑर्डरी,बचत खाते याशिवाय प्रमाणपत्र बाबतीतल्या तक्रारींचा समावेश आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील डाक सेवेबाबतच्या आपल्या तक्रारीचे अर्ज योग्य त्या माहितीसह निरसन होण्यासाठी, सहाय्यक निर्देशक डाक सेवा आणि सचिव,डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय,4था मळा,मुंबई येथे, दि.11मार्च 2024 पर्यंत पाठवावेत.दि. 11 मार्च 2024 नंतर आलेल्या तक्रारींच्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याची माहिती,कोल्हापूर डाक विभागाचे प्रवरअधीक्षक ए.व्ही.इंगळे यांनी दिली आहे.