जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, उत्तर प्रदेश मधील वाराणसी मतदार संघातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. आज भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी,भारतीय जनता पार्टीच्या देशातील आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी 195 उमेदवारांची यादी जाहीर केली असून,त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील मात्र एकाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही.
देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या उमेदवारांच्या यादीमध्ये,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्यामुळे,राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आलेले असून,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली व्यक्ती आहे.त्यामुळे त्यांच्या नावाला फार मोठे महत्त्व आहे.देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी,भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या 195 उमेदवारांच्या यादीमध्ये,34 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश असून,यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे शिवाय 2 माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.
आगामी देशातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या 195 उमेदवारांच्या यादीमध्ये,27 अनुसूचित जाती उमेदवार,18 अनुसूचित जमातीचे उमेदवार,57 मागासवर्गीय उमेदवारांसह 28 महिला उमेदवारांचा समावेश आहे.आज भारतीय जनता पार्टीने घोषणा केलेल्या 195 लोकसभा उमेदवारांच्या यादीमध्ये,गुजरात मधील गांधीनगर मधून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लढवणार असून, अमेठीतून स्मृती इराणी,लखनऊतून राजनाथ सिंग,शिवाय मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण,केंद्रीय मंत्री मनसुख मांडवी,अर्जुन राम मेघवाल,देवुसिंग चव्हाण राजाभैय्या,अजय मिश्रा,प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी, ज्योतिरादित्य शिंदे,जी.किशन रेड्डी,सर्वानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर,भूपेंद्र यादव यांचे सह भारतीय जनता पार्टीच्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांच्या उमेदवारीचा समावेश आहे.
आज भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन,भारतीय जनता पार्टीच्या 195 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र यादी जाहीर होणार असल्याचे समजले आहे.महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना,नागपूर मधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा,पहिल्या यादीमध्ये झाली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले गेले आहे.