जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीचे जागावाटप 2 दिवसात पूर्ण होईल,असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे सांगितले आहे.भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीनंतर,त्यांनी महाराष्ट्रातील महायुतीच्या जागा वाटपाबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र राज्यातील महायुतीचे जवळपास 80 टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून,20 टक्केच काम अपूर्ण आहे,ते जवळपास दोन दिवसात पूर्ण होणार आहे असे त्यांनी सांगितले आहे.महाराष्ट्र राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या वाट्या आलेल्या जागा व अपेक्षित असलेल्या जागा याची तपशीलवार माहिती,भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विशद करून सांगितली आहे.
याबाबतीत पुढील निर्णय केंद्रीय निवडणूक समितीच्या संमतीने घेतला जाईल,असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान सातारचे उदयनराजे भोसले व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज बैठक होण्याची शक्यता,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील तीन पक्षांमधील महायुतीच्या जागा वाटपाचे काम लवकरच पूर्ण होईल.!अशी शक्यता दिसत आहे.