जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नवी दिल्लीत सन 2022 व सन 2023 चे "संगीत नाटक अकादमी पुरस्कार",देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सन 1952 सालापासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार संगीत,नृत्य,नाटक, लोककला व नाट्य कला या क्षेत्रासाठी दिले जातात.प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय संगीतातल्या गायिका देवकी पंडित, कलापिनी कोमकली,मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना हे पुरस्कार मिळाले आहेत.
नवी दिल्ली येथे "संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे" वितरण झालेल्या समारंभास,देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ह्या उपस्थित राहुन,त्यांनी स्वतःच्या हस्ते जवळपास 80 नवोदित देश पातळीवर प्रसिद्ध असलेल्या कलाकारांना पुरस्कार दिले आहेत.
"संगीत नाटक अकादमी पुरस्कार" हे संगीत,नृत्य,नाटक, लोककला,नाट्यकला या क्षेत्रात दिले जात असून,रुपये 1,00,000 रुपये रोख,ताम्रपट,महावस्त्र असे या पुरस्कारात समावेश आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या "संगीत नाटक अकादमी पुरस्कारा"च्या समारंभास,संगीत क्षेत्रातील,नृत्य क्षेत्रातील, नाट्य क्षेत्रातील,लोककला क्षेत्रातील दिग्गज कलाकार, प्रसिद्ध सन्माननीय व्यक्ती व रसिक वर्ग उपस्थित होता.