जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना 28 मार्च 2024 पर्यंत उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे.गेले काही दिवस राज्यातील तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चालला असून,28 मार्चपर्यंत महाराष्ट्र राज्यात काही ठिकाणी, उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता असल्याचे व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील तापमान ही दिवसेंदिवस वाढत चालले असून,सध्या कमाल तापमान 37 अंशावर आहे.महाराष्ट्र राज्यातील बहुतांश ठिकाणी पारा हा 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या घरात आहे.महाराष्ट्र राज्यातील सांगली, कोल्हापूर,सोलापूर,मराठवाड्यातील जिल्हे व विदर्भातील जिल्ह्यांच्या ठिकाणी तापमानात कमालीची वाढ होत असून,नागरिंक कामाव्यतिरिक्त बाहेर पडण्याचे टाळत आहेत.
काल कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात पावसाच्या तुरळक सरी आल्या होत्या.सध्या सांगलीचे कमाल तापमान हे सुद्धा वाढत चालल्याचे दिसून येत आहे.महाराष्ट्र राज्यातील तज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार,नागरिकांनी भर दुपारी उन्हात फिरणे टाळावे,भरपूर पाणी प्यावे असे आवाहन केले आहे.