जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया.
देशातील भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा उमेदवारांची 5वी यादी जाहीर झाली असून,त्यामध्ये माजी निवृत्त न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरून,माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय हे निवृत्त झाले होते.पश्चिम बंगाल मधून माजी न्यायमूर्ती अभिजीत गंगो उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली असून,उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथून भारतीय जनता पार्टीच्या नेत्या मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते संदीप पात्रा यांना सुद्धा पुन्हा उमेदवारी मिळाली असून,ते ओडीसाच्या पुरीतून उमेदवारी अर्ज भरतील.
दरम्यान मंडी लोकसभा मतदारसंघातून प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत यांना लोकसभेच्या उमेदवारीचे तिकीट देण्यात आले आहे.गेले काही दिवस प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत यानी,भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्याची भूमिका वठवत असून,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तिने घातलेला वाद सर्वश्रुत आहे.त्याचबरोबर रामायणातील अजरामर भूमिका केलेले अरुण गोविल यांना,लोकसभेच्या मेरठ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली असून,एका प्रसिद्ध अभिनेत्याला भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
कुरुक्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने उद्योगपती नवीन जिंदल यांना उमेदवारी दिली आहे.एकंदरीतच भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेच्या उमेदवारांची 5 वी यादी जाहीर झाली असून,त्यात प्रामुख्याने प्रसिद्ध अभिनेत्री व माजी न्यायमूर्तींचा समावेश आहे.