कोलेस्ट्रॉल नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवणारे 6 पदार्थ- नियमितपणे खा आणि कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून चिंतामुक्त व्हा!.--

0

 आरोग्य भाग- 46

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

बैठ्या कामाचे वाढलेले तास,व्यायामाचा अभाव,स्ट्रेस, चुकीची आहारपद्धती या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम कोलेस्ट्रॉल वाढण्यावर होते.अनेकदा अनुवंशिकताही कोलेस्ट्रॉल वाढीसाठी कारणीभूत ठरते.कोलेस्ट्रॉल वाढीचा संबंध थेट हृदयाशी.त्यामुळे ते कंट्रोलमध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. म्हणूनच आता असे काही पदार्थ पाहूया जे नियमितपणे खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते,अशी माहिती आहारतज्ज्ञ कशिका भाटिया यांनी HT Digital शी बोलताना दिली.

 यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बदाम.व्हिटॅमिन ई, ॲण्टीऑक्सिडंट्स,इसेंशियल ऑईल यांनी परिपूर्ण असलेले बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत.६ते८तास पाण्यात भिजवलेले आणि टरफलं काढून टाकलेले बदाम खाणं अधिक फायदेशीर.

दुसरं म्हणजे अक्रोड.प्रोटिन्स,व्हिटॅमिन्स,मिनरल्स,ओमेगा ३ फॅटी ॲसिड असणारे अक्रोड पाण्यात किंवा दुधात ६ ते ८ तास भिजत घालावेत आणि त्यानंतर खावेत.स्ट्रेस लेव्हल कमी करून मानसिकदृष्ट्या स्ट्राँग होण्यासाठीही अक्रोड फायदेशीर ठरतात.

चिया सिड्समध्येही हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी उपयुक्त ठरणारे ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते.मधुमेह असणाऱ्यांसाठीही चिया सिड्स फायदेशीर ठरतात.कारण त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

ओट्समध्ये असणारे सोल्यूबल फायबर बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन,मिनरल्स,प्रोटिन्स आणि नॅचरल ग्लुकोज असणारे खजूर खाणंही हृदयासाठी उपयुक्त आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी ६ ते ८ तास पाण्यात भिजवलेल्या मनुका खाव्या.

हा लेख आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशन श्रीयुत संतोष सावंत सर यांचे कडून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top