जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाची(शिंदे गट)लोकसभा निवडणुकीसाठी,8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबईमधील दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघासाठी श्री.राहुल शेवाळे,कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी श्री.संजय मंडलिक,शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी श्री. सदाशिव लोखंडे,बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी श्री. प्रतापराव जाधव,हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी श्री. हेमंत पाटील,मावळ लोकसभा मतदार संघासाठी श्री.श्रीरंग बारणे,रामटेक मतदार संघासाठी श्री.राजू पारवे व हातकणंगले मतदारसंघासाठी श्री.धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे (शिंदे गट) सचिव संजय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई येथे,8 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाराष्ट्र राज्यातील शिवसेना शिंदे गटाच्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील लढत ही,राज्यात एक मुख्य लक्षणीय रंगतदार लढत ठरणार आहे.