जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया.
देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,भारतीय जनता पार्टीने,महाराष्ट्र राज्यासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून,यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी.नड्डा,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.
त्याशिवाय गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल,छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय,मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रीय मंत्री नारायण राणे,केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा,केंद्रीय मंत्री रामदास आठवले,केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर,केंद्रीय मंत्री पियुष गोयल,केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील आदींचा समावेश आहे.
दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असून,मागील लोकसभेत नवनीत राणा या अपक्ष म्हणून निवडून आलेल्या खासदार आहेत.कर्नाटक राज्यातून चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघातून गोविंद कर्ज यांना तिकीट देण्यात आले आहे.
एकंदरीत भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र राज्यातील लोकसभा मतदारसंघासाठी दिग्गज नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करून,महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्याचे ठरले असल्याचे दिसत आहे.