जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली अखेर पुन्हा तिसऱ्यांदा विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना,सांगलीतील लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे.काल भारतीय जनता पक्षाकडून देशातील आगामी लोकसभेच्या मतदारसंघाच्या उमेदवारीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली असून,त्यात सांगली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या नावावर अखेर भारतीय जनता पार्टी कडून,सांगली लोकसभेच्या उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील हे यापूर्वी दोनदा अनुक्रमे 2014 साली व 2019 साली,सांगली लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय झाले होते.
काल सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना,सांगली लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर,सांगलीतील मार्केट यार्ड मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात,कार्यकर्त्यांच्याकडून व पदाधिकाऱ्यांच्याकडून आनंद व्यक्त करून जल्लोष करण्यात आला.
काल सांगलीतील भारतीय जनता पार्टीच्या मार्केट यार्ड मधील कार्यालयात,भाजपचे पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार,आमदार सुधीर गाडगीळ,भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आदींच्या उपस्थितीत,कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्साहजनक वातावरणामध्ये जल्लोष व्यक्त केला.दरम्यान सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,देशाचे गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रती आभार व्यक्त करून,पक्षाने जो विश्वास ठेवून,सांगली लोकसभेची जी उमेदवारी दिली आहे,त्यांचा विश्वास सार्थ करीन असे प्रतिपादन केले आहे.सांगली मतदारसंघातील आजपर्यंत विकासाची असंख्य कामे, खासदारकीच्या कालावधीत केंद्रातील निधी आणून केली आहेत,त्याची ही पोच पावती असल्याचे नमूद करून, सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ भारतीय जनता पक्षाचे नेते यांचा व कार्यकर्त्यांची एकजूट यांचा,माझ्या उमेदवारी मिळण्यात बहूमोलाचा मौलिक वाटा असल्याचे म्हटले आहे.एकंदरीत सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना, भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असल्यामुळे,त्यांची खासदारकीची हॅट्रिक पूर्ण होईल अशी चिन्हे दिसत आहेत.