जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे महापालिकेच्या आयुक्तपदी तथा प्रशासक म्हणून राजेंद्र भोसले यांची नियुक्ती झाली असून,नूतन पुण्याचे आयुक्त म्हणून निवड झालेले राजेंद्र भोसले हे सध्या मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.यापूर्वी पण त्यांनी सोलापूर,नगर येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी,पुण्याच्या आयुक्तपदी तथा प्रशासकपदी राजेंद्र भोसले यांची झालेली निवड ही महत्त्वाची म्हणावी लागेल. पुण्याचे यापूर्वीचे आयुक्त विक्रम कुमार यांची मुंबईला बदली झाली असून,त्यांच्या जागी राजेंद्र भोसले हे पुण्याचे नवीन महापालिका आयुक्त तथा प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत.यंदाच्या लोकसभेची निवडणुकीसंबंधी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी,पुण्याचे आयुक्त म्हणून राजेंद्र भोसले यांची नियुक्ती महत्त्वाची ठरली आहे.