आरोग्य भाग- 45.
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
तुम्हीही रोज दुधाचा चहा पिता का.? सकाळच्या एक कप गरम चहाने दिवसभर फ्रेश वाटतं.पण चहाबाबत एक अशी बाब आहे जी जास्तीत जास्त लोकांना माहीत असायला हवी.
रिकाम्या पोटी दुधाचा चहा पिण्याचे नुकसान.तेच जाणून घेऊया...
१) ब्लोटिंग...
फार जास्त दूध असलेला चहा प्यायल्याने तुमचं पोट फुगू शकतं.चहामध्ये कॅफीन असतं.जे पोटासाठी चांगलं नसतं. जेव्हा या पेयामध्ये दूध मिक्स केलं जातं,तेव्हा अॅसिडिटीही वाढते.
२) डिहायड्रेशन...
चहामध्ये कॅफीनसोबतच थियोफिलाइनही असतं.चहाचं फार जास्त सेवन शरीराला डिहायड्रेट करतं.ज्यामुळे वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात.
३) स्ट्रेस वाढतो...
जर तुम्ही चिंतेने पीडित असाल तर पुन्हा पुन्हा चहा पिणं बंद करा.या तुमची चिंता आणखी जास्त वाढत आहे.
४) झोप न येणे...
चहामध्ये कॅफीन असतं,जे तुमची झोप खराब करू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला आधीच झोप न येण्याची समस्या असेल तर दुधाचा चहा पिणं बंद करा.
५) हाय ब्लड प्रेशर वाढेल...
फार जास्त दुधाच्या चहाने ब्लड प्रेशर बिघडू शकतं आणि त्यामुळे ज्यांना आधीच ही समस्या आहे त्यांनी जास्त प्रमाणात दुधाचा चहा घेऊ नये.
हा लेख डॉ.सुनील इनामदार यांचा असून आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशन श्री.संतोष सावंत सर यांच्या माध्यमातून संपादन करून,जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.