जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे दादर-हुबळी एक्स्प्रेसला थांबा मंजूर होणेसाठी बऱ्याच दिवसांपासून असणाऱ्या मागणीला आज यश आले.रेल्वे बोर्डचे संयुक्त संचालक श्री.विवेक कुमार सिन्हा यांनी त्या संदर्भातील आदेश त्यांच्या सहीने पारीत झालेले आहेत,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील म्हणाले,पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथून बरेच नोकरदार,विद्यार्थी,शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतो.रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा मंजूर करणेसाठी मागणी होत होती.या अनुषंगाने रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांचेकडे दादर-हुबळी या रेल्वे गाडीला किर्लोस्करवाडी येथे थांबा मंजुर करणेबाबत पाठपुरावा करुन किर्लोस्करवाडी येथे दादर-हुबळी एक्स्प्रेस(रेल्वे क्र. १७३१७/१८) या गाडीचा थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
या थांब्यामुळे पलूस तालुक्यातील प्रवाशांना किर्लोस्करवाडी येथील किर्लोस्कर कारखान्यातील कर्मचारी व कामगार वर्गाला या थांब्याचा लाभ होणार आहे,असेही खासदार संजयकाका पाटील यांनी नमूद केले.