जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षाच्या काळात एकही दिवस सुट्टी न घेता,देशासाठी दिवसरात्र काम केले असल्याने,माझ्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीत,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे एक दैवी व्यक्तिमत्व असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.एकेकाळी ज्या अमेरिकेने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना व्हिसा नाकारला होता,पण त्याच अमेरिकेने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे न भूतो न भविष्यती असे स्वागत केले होते.आजही जगातील सर्वोच्च स्थानी असलेल्या नेत्यांमध्ये त्यांची एक,स्वतःची प्रतिमा जागतिक स्तरावर उदयास आली आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासारखी माणसे नेहमी जन्माला येत नसतात,तो एक देवाने दिलेल्या दैवी शक्ती असलेल्या व्यक्तिमत्त्वाचा माणूस होय अशा शब्दात,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
काल खडकवासला येथे विधानसभा मतदारसंघाच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकीदरम्यान,पुणे,शिरूर, बारामती आदी ठिकाणातील महायुतीच्या सर्व सहयोगी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषणात कौतुकाची भूमिका विशद करत असताना,भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानाही हे भाषण हृदयस्पर्शी होऊन गेले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्याबद्दल ठिकठिकाणीच्या भाषणात कौतुकास्पद बोलत होते,परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही एक देशासाठी कार्य करणारी दैवी शक्ती असल्याचे म्हटल्यामुळे,संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय पटलावर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.