जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा हे भारतीय जनता पार्टीचे कर्नाटकामधील वरिष्ठ व जेष्ठ नेते आहेत.पोक्सो अॅक्ट (POCSO Act) अंतर्गत येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
17 वर्षांच्या मुलीच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीवरुन येडियुरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिवनगर पोलिसांनी गुरुवारी (14 मार्च) रात्री उशिरा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा (81) यांच्यावर गुन्हा दाखल केला.17 वर्षांच्या मुलीच्या आईनं केलेल्या तक्रारीवरून लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा, 2012 (POCSO) च्या कलमाखाली कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्नाटक मध्ये माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे,राजकीय क्षेत्रात सध्या चर्चेला उधाण आले आहे.