जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांनी संयमाने बोलावे; सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेला मिळाली आहे. भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करून काय साध्य करायचे आहे.? हे माहित नाही असे खा.संजय राऊत प्रसार माध्यमांसमोर बोलले होते.खा.राऊत यांच्या वक्तव्याने सांगली जिल्ह्यातील काँग्रेस दुखावली आहे.त्यामुळे खा.राऊत यांनी काँग्रेस विषयी वापरलेले अपशब्द मागे घ्यावेत व काँग्रेसची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी केली आहे.
श्री.नंदकुमार कुंभार पुढे म्हणाले कि,महाविकास आघाडी लोकसभेचे उमेदवार ठरवत असताना,आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र येऊन उमेदवारी जाहीर करायची आहे.तसे न करता शिवसेनेने सांगली लोकसभा उमेदवारी जाहीर करून, या मतदारसंघांमधील काँग्रेस कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत.सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे विद्यमान दोन आमदार आहेत.स्व.वसंतदादा पाटील,स्व. पतंगराव कदम,स्व.आर.आर.पाटील यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत,असेही काँग्रेसचे प्रदेश महासचिव नंदकुमार कुंभार यांनी म्हटले आहे.