सांगलीत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला स्नेहसंमेलन व सत्कार सोहळा संपन्न ; स्त्रीशक्तीमध्ये जगाचा चेहरा मोहरा बदलण्याची ताकद.--पृथ्वीराज पाटील.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली : भारताच्या राजसत्तेत व राजकारणात स्त्रियांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून भारताच्या जडणघडणीत त्यांचा अमूल्य वाटा आहे. राजकीय क्षेत्रात महिला सक्रीय होत असून देशाबरोबरच जगाचाही चेहरामोहरा बदलण्याची ताकद स्त्रीशक्तीमध्ये आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांनी केले.ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या  वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला स्नेहसंमेलन व सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सौ.विजया पृथ्वीराज पाटील,जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता मा.सौ.ज्योती देवकर,सौ.अर्चना पवार,सौ.पूनम चव्हाण,सौ रेखा पाटील,सौ.सुमय्या बागणीकर,सौ.पूजा भगत,सौ.सुरेखा शेख आदी सत्कारमूर्ती तसेच सौ.राधा पाटील,सौ.प्रियांका पाटील,सौ.प्रिया पाटील,तसेच मराठा उद्योजक कक्ष पश्चिम विभाग महिला अध्यक्षा सौ.आशा पाटील,सरला बाकरवडी उद्योगाच्या संचालिका सौ.कीर्ती देशमुख,सौ.क्रांती कदम,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ.प्रणिता पवार,नगरसेविका आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

 पुढे बोलताना सौ.विजया पाटील म्हणाल्या की,सांगली शहराच्या व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महिला वर्गाने अशीच साथ यापुढेही देऊन राजकीय कार्यास पाठबळ द्यावे.आपण सर्व मिळून सांगली शहराचा, जिल्ह्याचा व राज्याचा विकास घडवून प्रगतीची कास धरूया असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी प्रमुख पाहुण्या सौ.ज्योती देवकर म्हणाल्या की,महिलांनी आता स्वतःसाठी जगायला हवे.दुसऱ्या स्त्रीशी आपली तुलना न करता स्वतःला घडवावे यातच खरे स्त्रीत्व आहे.महिलांना जे आवडते ते त्यांनी आनंदाने करावे असे सुधा मूर्तींचे विचार त्यांनी महिलांना पटवून दिले.

याप्रसंगी सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यनिमित्ताने हळदी-कुंकवाबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले होते.सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.शेवटी लकी ड्रॉ कुपन काढण्यात आले.विजयी महिलांना सुवासिनीचे लेणे बक्षीस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.अरुणा अमोल सूर्यवंशी यांनी केले.शेवटी आभार सौ.प्रियांका पाटील यांनी मानले.या कार्यक्रमास घे भरारी भिशी ग्रुपमधील सभासद महिला, परिसरातील व विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top