जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोलकत्ता येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पहिल्या अंडरवॉटर मेट्रो सेवेचे आज उद्घाटन होणार असून, ही अंडरवॉटर मेट्रो सेवा हुगळी नदीच्या खाली 32 मीटर खोल असलेल्या पाण्याच्या खालून धावणार आहे.
कोलकत्ता येथे अंडरवॉटर मेट्रोसेवा हावडा मैदान स्टेशन पासून ते एस्प्लेनेड स्टेशन पर्यंत असणार आहे.कोलकत्ता येथील हुगळी नदीच्या पाण्याखाली धावणारी अंडरवॉटर मेट्रो सेवा ही कोलकत्ता शहराला जोडणारी असून,शिवाय देशातील नदीच्या पाण्याखालून वाहणारी ही,पहिली अंडरवॉटर मेट्रो सेवा असणार आहे.
या देशातील पहिल्या वहिल्या नदीच्या पाण्याच्या खालून धावणारी ही मेट्रो सेवा,देशाला समर्पित करणाऱ्या इंजीनियरिंग डिपार्टमेंटच कौतुक करावे तितके थोडे आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हणले आहे.केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षाच्या काळात या देशातील पहिल्या, नदीच्या पाण्याच्या खालून धावणाऱ्या,अंडरवॉटर मेट्रो सेवेच्या कामास चांगलीच गती दिली होती.कोलकत्ता येथील हुगळी नदीच्या खालून सुरू होणाऱ्या,देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो सेवेचे आज होत असलेले लोकार्पण,ही एक फार मोठी आधुनिक विज्ञानातील घटना म्हणावी लागेल.!.