जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:सोशल मीडिया
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत घड्याळ चिन्ह वापरताना,सर्वोच्च न्यायालयाच्या अटींचे पालन करावे लागणार असून,त्यामुळे तूर्तास तरी घड्याळ हे चिन्ह वापरण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मुभा मिळाली आहे.त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव लोकसभा निवडणुकीत व विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यास,सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक चिन्ह तुतारीसह परवानगी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटालाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे जाहीर केल्यानंतर,अधिकृत घड्याळ चिन्ह बहाल केले होते.त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने,सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.त्यावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरताना,चिन्हाबाबत वाद न्यायप्रविष्ट असल्याचे नमूद करावे लागेल.त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या गटाला देण्यात आलेले नाव व तुतारी हे चिन्ह लोकसभा व त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत वापरण्यास मुभा दिली असून,हे चिन्ह इतर कोणालाही देण्यात येऊ नये असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले असून,केंद्रीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी असे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे.
एकंदरीतच राजकीय वातावरण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाच्या गोष्टीने रंगणार असे दिसत आहे.