जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्हा नागरिक जाग्रुती मंचने सांगली स्टेशन वाचवा व संपर्क क्रांती थांब्यासाठी आंदोलन पुकारले होते.त्यापैकी बऱ्याच मागण्या मध्य रेल्वेने मान्य केल्या आहेत.पण दिल्ली व चंदीगड जाणारी संपर्क क्रांति एक्सप्रेसला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबवण्याची मागणी मात्र अद्याप मान्य झालेली नाही.
संपर्क क्रांतीला सांगली स्टेशनवर थांबा नसल्याने रात्री 2 वाजता नागरीकांना मिरज जाण्याचा नाहक त्रास.!
दरवर्षी जवळपास दोन लाख सांगलीकरांना रात्री दीड दोनच्या सुमारास सांगली शहरातून व शहराच्या विस्तारित भागातून 15 ते 25 किलोमीटरचे अंतर पार करून मिरज रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांती गाड्यां पकडण्यासाठी जावे लागते,रात्रीच्या अशा वेळेला सांगली रेल्वे स्टेशन शहराच्या सर्व परिसरातून हाकेच्या अंतरावर असताना देखील रेल्वे विभाग संपर्क क्रांति गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनला थांबा देत नसल्यामुळे लोकांना पंधरा ते वीस किलोमीटर दूर जाऊन मिरज रेल्वे स्टेशन वरून संपर्क क्रांती गाड्या पकडाव्या लागतात.
अजून किती वर्ष संपर्क क्रांतीच्या सांगली थांबण्यासाठी वाट बघावी लागेल.!
वारंवार रेल्वे प्रशासनाला लोकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचने प्रत्यक्ष भेटून अवगत केले असताना देखील याबाबतीत मध्य रेल्वे तसेच रेल्वे बोर्ड कुठलेही निर्णय घेत नाही.
सांगलीवर मोठा अन्याय: दिल्ली जाणाऱ्या 25 ते 30 रेल्वे गाड्या मनमाड व भुसावळला थांबतात अशा स्टेशनवर संपर्क क्रांतीलाही थांबा देण्यात आला.पण सांगली सारख्या 10 लाख लोकसंख्येच्या शहराला जिथे रोज दिल्ली जाणारी एकच रेल्वेगाडी थांबते अशा सांगली स्टेशनवर संपर्क क्रांतीचा थांबा देण्यात आला नाही.
संपर्क क्रांति रेल्वे गाड्या सुरू होऊन जवळपास 15 वर्षांचा कालावधी उलटला आहे.तरीही सांगली सारख्या दहा लाख लोकसंख्येच्या शहराला संपर्क क्रांती थांबा मिळत नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी बाब कोणती असा प्रश्न नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी विचारला आहे.? सांगली पेक्षा लहान असणाऱ्या मनमाड व भुसावळ या रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांती गाडीला थांबा देण्यात आलेला आहे. वास्तविक मनमाड व भुसावळ सारख्या रेल्वे स्टेशनवर दररोज 25 ते 30 दिल्ली जाणाऱ्या गाड्या थांबतात तरीही संपर्क क्रांतीला तिथे थांबा दिला जातो,पण सांगली सारख्या दहा लाख लोकसंख्येच्या शहरात जिथे दिल्ली जाणारी फक्त एकच रेल्वे गाडी आहे दिवसभरात त्या रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांतीला थांबा दिला जात नाही ही मोठी आश्चर्याची बाबत आहे आणि त्या विरुद्ध नागरिक जागरिक जाग्रुती मंच गप्प बसणार नाही.
श्री सतीश साखळकर यांनी सांगली जिल्ह्यातील पालकमंत्री खासदार आमदार व इतर बड्या नेत्यांना आवाहन केले आहे की,जिल्ह्यातील सामान्य माणसाबद्दल विचार करावा व संपर्क क्रांति साठी रात्री दोन वाजता लोकांना होणारा त्रास पहावा व याबाबतीत मानवतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा.आता पुणे सांगली रेल्वे मार्ग विद्युतीकरण व दुपत्रीकरण पूर्ण झाले असून रेल्वे गाड्या जलद वेगाने धावत आहेत पुणे ते सांगली कमी वेळेत गाडी पोहोचत आहे.जर सांगली रेल्वे स्टेशनवर संपर्क क्रांति गाडीला फक्त 5 मिनिटांचा थांबा देण्यात आला तर त्या गाडीला दिल्ली किंवा बंगळूर जाण्याला खूप जास्त विलंब होणार नाही.पण दरवर्षी दोन लाख सांगलीकरांना होणारा त्रास वाचणार आहे.