जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज, मद्यधोरण गैरव्यवहार प्रकरणी,उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नसून,सक्तवसुली संचनालयाच्या(ईडी) अटकेच्या कारवाईला आव्हान देणारी त्यांची याचिका,उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 एप्रिल 2024 रोजी ठेवली असून,त्यावेळी सक्त वसुली संचालनालयास,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना,सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेस फेटाळून लावल्याने मोठा धक्का बसला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या,सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेच्या कारवाईला आव्हान देण्याच्या याचिकेवर आता,3 एप्रिल 2024 रोजी सुनावणी होऊन, त्यावर काय निर्णय होतो.? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.!