जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुण्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नेत्यांच्या बरोबर असलेल्या काही कार्यकर्त्यांना देण्यात आलेली सुरक्षा,काढून घेण्याचा निर्णय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला असून,त्या निर्णयानुसार त्यांनी कार्यवाही पण केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर,पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा मोठा निर्णय,आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेतला असून, राजकीय नेत्यांच्या बरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाची पोलीस सुरक्षा पुरवणे कितपत योग्य आहे.? हा प्रश्न गेले कित्येक दिवस राज्यात चर्चेत आहे.
पुण्यातील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पुरवण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था कोणी पुरवली.? व कशासाठी पुरवली.?याचे उत्तर अजूनही सापडत नाही.पुण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नेत्यांच्या बरोबर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलीस सुरक्षा काढून घेतलेल्या निर्णयाचे, पुण्यात सर्वत्र स्वागत होताना दिसत आहे.