देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून,देशातील कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नसल्याचे प्रतिपादन.-- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वृत्त- सोशल मीडिया

देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या माध्यमातून कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले आहे.देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याकडून, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या बाबतीत जोरदार टीका होत असल्यामुळे,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज याबाबतीत स्पष्टीकरण दिले आहे. 

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी,एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दिन ओवेसी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वर जोरदार टीका केली आहे.दरम्यान देशातील विरोधी पक्षांचे नेते, नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतीत अपप्रचार करीत असून,देशातील धार्मिक अल्पसंख्याकांचे कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

 कोणाचेही नागरिकत्व काढून घेतले जाणार नसल्याची हमी त्यांनी आज हैदराबाद येथील मेळाव्यात दिली आहे. देशातील काँग्रेस पक्षाने यापूर्वीच या कायद्याला विरोध केला होता.दरम्यान आसाम मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नंतर,सर्वत्र आंदोलनाचे व निदर्शनाचे पडसाद दिसत आहेत.देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर,आता पात्र नागरिकांना नोंदणीसाठी,भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी,केंद्रीय गृह मंत्रालयाने एक वेगळे पोर्टल चालू केले आहे.

              एम.के.स्टलिन तामिळनाडू मुख्यमंत्री.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर,मुस्लिम लीगने एक यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती मागितली आहे. केरळचे मुख्यमंत्री पी.विजयन व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टलिन यांनी मात्र राज्यात कोणत्याही परिस्थितीत, सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करणार नसल्याचे म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top