जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुणे शहर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा आणि झोपडपट्टी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक, आज शहर कार्यालयात घेण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टीने या बैठकीत नियोजन करण्यात आले.आज झालेल्या पुण्यातील बैठकीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
आजच्या पुण्यातील झालेल्या शहर भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा आणि झोपडपट्टी आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये,आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली.
बैठकीला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,शहराध्यक्ष धीरज घाटे, लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले,अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष भिमराव साठे,झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार,शहराचे सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, पुनीत जोशी यांच्यासह अनु.जा.मोर्चाचे अतुल साळवे,महेश सकट,छगन बुलाखे,संदीप शेळके,किरण क्षीरसागर,निलेश सोनवणे,संगीताताई चौरे,दुर्गेश हातागळे,संदीप शेंडगे, विकास सोनवणे,योगेश सूर्यवंशी,मालतीताई अवघडे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.