जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दिल्ली येथे आज सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत जिल्हा काँग्रेस पक्षाकडून अत्यंत आक्रमक हालचाली घडल्या असून,काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची,आमदार विश्वजीत कदम,आमदार विक्रम सावंत,सांगली लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार विशाल पाटील व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेऊन,सविस्तर सांगली लोकसभा मतदारसंघावरील पूर्वपारंपारिक हक्क सांगितला आहे.
दुसरीकडे शिवसेनेच्या यादीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातून पै.चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असल्यामुळे,प्रदेश काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.सांगलीतील वरिष्ठ काँग्रेस आमदारांसह नेत्यांनी आज,काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे सह काँग्रेसचे वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल,मुकुल वासनिक यांच्या भेटी घेऊन,सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची आग्रही भूमिका मांडली आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेतूनच,सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हाला मिळाली असल्याचा दावा केला आहे.
एकंदरीत महाविकास आघाडीत,सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ताण तणाव विकोपाला गेल्याचे दिसत असून,सांगली लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत.