सांगलीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ,दि.1मे 2024 रोजी सायंकाळी 4:00 वाजता, चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स ग्राउंड वर,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ,दि.1 मे 2024 वार बुधवार रोजी सायंकाळी 4:00 वाजता,चिंतामणराव कॉलेज ऑफ कॉमर्स ग्राउंड वर,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व हिंदुत्वाची तळपती तलवार योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार आहे. सध्या सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार जोरात सुरू असून,ठिकठिकाणी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मेळावे व सभा चालू आहेत. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा,भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाल्या आहेत.सांगलीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांना पक्षाने तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी रणांगणात उतरवले असून, लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ते विजयाची हॅट्रिक पूर्ण करतील असे वाटते.याकडे सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत असून, विद्यमान खासदार व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याबरोबर,अपक्ष उमेदवार विशाल पाटील व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची लढत असणार आहे. 

एकंदरीतच तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे,तस -तशी राजकीय आरोप- प्रत्यारोपाने सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top