जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित इन्व्हिटेशन लीग स्पर्धेकरिता 16 वर्षा खालील मुलांच्या जिल्हा संघ निवड चाचणीचे आयोजन सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांचे वतीने करण्यात आले आहे.
16 वर्षा खालील मुलांच्या निवड चाचणी करिता जन्मतारीख.1/9/2008 पुढील असावी,हि निवड चाचणी शनिवार दि.06/04/2024 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण,सांगली येथे होणार आहे.निवड चाचणी साठी येताना आधार कार्ड व जन्मतारखेचा पुरावा सोबत आणावा.निवड चाचणी शुल्क रु 100/- व खेळाडूंनी स्वतःचे क्रिकेट साहित्य( किट) आणावे.
निवड चाचणी करिता जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा.असे आवाहन सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संजय बजाज यांनी केले आहे.