जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशात लोकसभा निवडणूक 2024 साठीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले असून,यामध्ये 13 राज्यातील 88 लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. देशात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी दि.26 एप्रिल 2024 ही तारीख मुक्रर करण्यात आली होती त्यानुसार आज मतदान शांततेत पार पडले आहे.
देशातील उत्तर प्रदेश,बिहार,मध्यप्रदेश,राजस्थान,महाराष्ट्र, केरळ आदी राज्यांचे,या दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानात समावेश होता.देशातील त्रिपुरातील एका जागेवर 77.97 इतके सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद झाली आहे. महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात 53.17 ते 53.71 इतके कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे.
देशातील राज्यांत झालेले टक्केवारी निहाय मतदान खालील प्रमाणे.:-
त्रिपुरा 77.97 टक्के.
मणिपूर 77.18% .
छत्तीसगड 72.51%.
पश्चिम बंगाल 71.84%.
आसाम 70.68%.
केरळ 65.04%.
कर्नाटक 64.57%.
जम्मू काश्मीर 67.22%.
मध्यप्रदेश 55.32%.
राजस्थान 60.06%.
बिहार 54.17%.
उत्तर प्रदेश 53.17%.
महाराष्ट्र 53.71%.
अशा रीतीने देशातील दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक 2024 चे मतदान दि.26 एप्रिल 2024 रोजी शांततेत व चोख बंदोबस्तात पार पडले आहे.