जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली लोकसभा मतदारसंघातील संजय काका पाटील यांची विजयाची हॅट्रिक ही निश्चित असून,किती मोठ्या मताधिक्याने विजयी होतात.? हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल! असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली येथे जाहीर सभेत केले.सांगली लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे संजय काका पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शनाने गुरुवारी अर्ज दाखल केला,त्यानंतर झालेल्या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील हे मोदींच्या इंजिनच्या डब्यामध्ये बसून दिल्लीला जात असून,आगामी येणारी 5 वर्षासाठी कुणाच्या हातात देश देणे? यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.इंडिया आघाडीच्या रेल्वेमध्ये नुसती इंजिने असून,जनतेला बसण्यासाठी डबेच नसल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभेत केले.आज सांगली येथे झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेस फार मोठी गर्दी झाली होती.