जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल,यंदा मे महिन्यात जाहीर होणार असून, सर्वसाधारणपणे बारावीचा निकाल मे च्या तिसऱ्या आठवड्यात व दहावीचा निकाल मे च्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्यातील बारावी व दहावी परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांचे सध्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्यातील बारावीच्या व दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरात लवकर लागण्यासाठी,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जोराचे प्रयत्न चालू असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ स्तरातील अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.
महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी व दहावी परीक्षेचा निकाल लवकर लागणार असल्याने,राज्यातील विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.