जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर लोकसभा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची,कोल्हापुरातील तपोवन मैदानात सायंकाळी सभा होणार असून,शक्ती प्रदर्शनासह जोरदार जय्यत तयारी करण्यात आली आहे.कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कोल्हापुरातील तपोवन मैदानात जाहीर सभा होणार असून,सभास्थानी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.
कोल्हापुरातील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते,कोल्हापुरातील सभा शक्ती प्रदर्शनासह यशस्वी होण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.कोल्हापुरातील तपोवन मैदानात सभेसाठी भव्य सभामंडप करण्यात आला असून,कोल्हापूर महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम रस्त्यांच्या पॅचवर्कची मोहीम राबवली आहे.
कोल्हापुरातील तपोवन मैदानात,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला आज सभास्थळाची, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ,खासदार धनंजय महाडिक,खासदार संजय मंडलिक,खासदार धैर्यशील माने आदींनी पदाधिकाऱ्यांसह पहाणी केली आहे.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीची यांची उद्या होणारी कोल्हापुरातील सभा शक्ती प्रदर्शनाने फार मोठी होणार असून,उद्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांसाठी व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील मतदारांसाठी काय संबोधित करतात.? याकडे सर्व सर्वांचे लक्ष लागले आहे.