जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाने,"लोकसभा निवडणूक 2024" साठी निवडणूक कालावधीत,ओपिनियन पोल व एक्झिट पोलला प्रतिबंध करण्यात आला असून,महाराष्ट्र राज्यातील निवडणुकीचे मतदान पाच टप्प्यांमध्ये होणार असल्याने,त्यानुसार राज्यात दि.19 एप्रिल रोजी सकाळी 7:00 वाजल्यापासून ते 1 जून 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत एक्झिट पोल व ओपिनियन पोल साठी प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासांच्या कालावधीत,संबंधित लोकसभा मतदारसंघाच्या ओपिनियन पोल व सर्वेक्षणाच्या परिणामांचे प्रसारण करण्यावर प्रतिबंध करण्यात आलेला असल्याचे निवडणूक आयोगाने एका अधिसूचनेद्वारे नमूद केले आहे.