जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
देशात काँग्रेस संविधानाचा अपमान करत असून,धर्माच्या आधारावर मुस्लिमाना इतरांचे आरक्षण मिळू देणार नसल्याचे प्रतिपादन देशाचे प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील जहीराबाद येथील जाहीर सभेमध्ये केले आहे. त्याबरोबर धर्माच्या आधारावर मुस्लिमाना,कोणत्याही परिस्थितीत मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत,इतरांचे आरक्षण मिळू देणार नसल्याची ग्वाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
देशातील कर्नाटक राज्यांमध्ये मुस्लिमांचा समावेश ओबीसी प्रवर्गात केल्यामुळे,पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येक सभेत काँग्रेसवर टीका करीत असून,काँग्रेसच्या काळात भारत विकासाच्या बाबतीत फारच मागे होता.एनडीएने देशाला फार मोठ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढले असून,पुन्हा देशाला वाईट दिवसांकडे नेण्याची आमची इच्छा नाही असे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसची वोट बॅंक जाऊ नये म्हणून हैदराबाद मध्ये देखील रामनवमीची शोभायात्रा काढण्यास हरकत घेतली जात आहे.
देशात काँग्रेस सत्तेवर आल्यावर वारशाच्या मिळालेल्या मालमत्तेवर 55% कर लागण्याची शक्यता असून,देशात या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्णपणे पराभूत करा असे आव्हान देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एकंदरीत आजच्या झालेल्या तेलंगणा मधील जहीराबाद येथील सभेस फार मोठी गर्दी झाली होती.