दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (शिंदे) पक्षाकडून अखेर आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी;आता लढत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्या विरोधात होणार.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाने अखेर आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली असून,आता त्यांची लढत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे.भारतीय जनता पार्टीने या जागेवर दावा सांगून त्या पद्धतीने उमेदवाराची चाचणी देखील सुरू केली होती,मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अखेर सरशी करत,दक्षिण मुंबईची जागा आपल्याकडे ठेवून घेतली आहे.

आर्थिक गैरव्यवहाराचे संबंध असल्याच्या कारणावरून, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या पत्नीस उमेदवारी देताना,भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला होता,परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अखेर आपल्या शिवसेना पक्षाकडून,आमदार यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीन आठवड्यापूर्वी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली होती.दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे पाचव्या टप्प्यात होत असून,त्याबरोबरच महाराष्ट्र राज्यातील दिंडोरी,धुळे, कल्याण,भिवंडी,पालघर,नाशिक,उत्तर मुंबई,ठाणे,उत्तर पश्चिम मुंबई,उत्तर पूर्व मुंबई,उत्तर मध्य मुंबई,दक्षिण मध्य मुंबई,दक्षिण मुंबई अशा 13 मतदारसंघात मतदान होत आहे.देशातील पाचव्या टप्प्यातील असणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची मुदत 3 मे 2024 रोजी संपत आहे.

एकंदरीतच महाराष्ट्र राज्यात सर्वत्र सर्वच ठिकाणच्या लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाने,राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, एकूण राज्यातील जनतेचा मतदानानंतरचा कौल कसा मिळतो.?हे पाहणे हिताचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top