जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून,विशेष सरकारी वकील व प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली असून,विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले गेले आहे.
दरम्यान दोनच दिवसापूर्वी महाविकास आघाडीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षाताई गायकवाड यांना उमेदवारी दिली असून,आता त्यांची लढत विशेष सरकारी वकील,प्रसिद्ध कायदेतज्ञ व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उज्वल निकम यांच्याशी होणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध कायदेतज्ञ असलेले उज्वल निकम हे विशेष सरकारी वकील असून,त्यांनी अनेक महत्त्वाच्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम केले आहे.गेले काही दिवस विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी मिळेल का नाही.? याबाबत चर्चा चालू होती.याला आता पूर्णविराम मिळाला असून,भारतीय जनता पार्टीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून,विशेष सरकारी वकील व प्रसिद्ध कायदेतज्ञ उज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मुंबईत घडलेल्या दहशतवादी हल्ल्यातील खटल्यात,विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची भूमिका संस्मरणीय ठरली असून,अशा बऱ्याच खटल्यांमध्ये त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम केले असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.महाराष्ट्र राज्यातील मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उज्वल निकम हे आता, महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड यांच्याविरुद्ध लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.