जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेली असल्याने,काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी नाराजी व्यक्त करत उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे.काल दि. 22/04/2024 रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती,परंतु काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून कायम ठेवला असून, त्यामुळे काँग्रेस पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
दि.25 एप्रिल 2024 रोजी यासंदर्भात एक मीटिंग आमची होणार असून,त्यावेळी याबाबतीत निर्णय घेतला जाणार आहे.काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सोबत राहणार असून,कोणत्याही परिस्थितीत मत विभाजन होणार नसल्याचे स्पष्ट संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्यातील लोकांना कोणत्याही परिस्थितीत मत विभाजन करायचे नसल्याचे दिसून येत आहे असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.