जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना अखेर वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.यापूर्वी अकोल्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे भाऊ माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी भेट घेऊन,वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याबाबत चर्चा केली होती.त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते प्रकाश आंबेडकर यांनी विशाल पाटील हे जर निवडणुकीत उभे राहणार असतील तर,आपण त्यांना सर्वतोपरी पाठिंबा देऊ असे आश्वासन दिले होते.त्यानुसार आजच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीने,सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देऊन एक मोठा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट होत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे जर निवडणुकीत उभे राहणार असतील तर,त्यांना पाठिंबा देण्यासह निवडून आणण्याची भूमिका बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली होती.त्यामुळे आता सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना,वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने जाहीर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.त्यानुसार आता सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रकाश शेंडगे यांना यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.
एकंदरीतच सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिल्याने,सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या जमेची एक फार मोठी बाजू निर्माण झाली आहे.