जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज यांचा मी पणतू असून,त्यांच्या रक्ताचा खरा वारसदार मीच आहे असे प्रतिपादन राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी राजवर्धन कदमबांडे हे कोल्हापुरात आले असून,आज त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मी कोल्हापुरात आलो असून,आत्ताचे छत्रपती शाहू महाराज हे खरे वारसदार नसून,गादीचे खरे वारसदार कोण आहे.? हे जनता ठरवेल असे प्रतिपादन राजवर्धन कदमबांडे यांनी केले आहे.
सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ,"मान गादीला आणि मत मोदीना"अशी घोषणा दिली गेली असून,आज धुळ्याचे नेते व स्वतः शाहू महाराज यांचे थेट वंशज म्हणवून घेणाऱ्या राजवर्धन कदमबांडे यांना अखेर,कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रणांगणात उतरवण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दि.27 एप्रिल रोजी सभा पार पडल्यानंतर,धुळ्याचे नेते राजवर्धन कदमबांडे हे आता कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत.एकंदरीतच जसजशी तिसऱ्या टप्प्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदानाची तारीख जवळ येत आहे,तशी तशी कोल्हापुरातील व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार.!हे मात्र निश्चित आहे.