जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आज अनपेक्षितपणे माघार घेतल्याने,राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय व अस्वस्थता पसरली असून,महाविकास आघाडीमध्ये यामुळे समाधानाचे वातावरण झाले आहे.काल सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित चे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला माघारीचा निर्णय वरिष्ठांकडे म्हणजेच वंचित चे नेते प्रकाशराव आंबेडकर यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता,उमेदवारी अर्ज मागे घेतला असून,त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच चर्चेला ऊत आला आहे.
दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम सातपुते हे,मी उभारण्याने संसदेत जाण्याची शक्यता असून,संविधान वाचवण्यासाठी मी उमेदवारी मागे घेत असल्याचे वक्तव्य राहुल गायकवाड यांनी केले आहे.याउलट भारतीय जनता पार्टीने संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत असे भारतीय जनता पार्टीचे नेते व लोकसभा निवडणुकीतील प्रमुख शहाजी पवार यांनी स्पष्ट केले आहे.