"होंडा मोटरसायकल चे बनावट पार्ट विक्री" प्रकरणी वाकड पोलीसांची मोठी कारवाई.

0

- 3 लाख 49 हजार 741 रूपये  किंमतीचा मुद्देमाल जप्त.

- होंडा मोटार सायकल अँड स्कूटर इंडिया प्रा.लि.कंपनीचे बनावट पार्ट विक्री प्रकरणी पोलिसांची धाड : कॉपीराईट कायदया प्रमाणे कायदेशीर कारवाई.

पुणे : (जनप्रतिसाद न्यूज : विशेष प्रतिनिधी).

बनावट पार्ट विक्री प्रकरणी वाकड पोलीसांनी मोठी कारवाई करुन एकूण 3 लाख 49 हजार 741 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.क्रांतिवीर नगर,थेरगाव,पुणे येथील बिल्डींगच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये होंडा मोटार सायकल अँड स्कूटर इंडिया प्रा.लि.कंपनीचे बनावट पार्ट विक्री प्रकरणी पोलिसांनी धाड टाकली.बनावट पार्ट विक्री करणाऱ्या संबंधितांवर कॉपीराईट कायदया प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी...

 दि.18/04/2024 रोजी,होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्राइवेट लिमिटेड कंपन्यांचे बनावट स्पेअरपार्टची विक्री (पिंपरी चिंचवड, पुणे) शहरातील क्रांतिवीर नगर, थेरगाव,पुणे येथील एका इमारतीचे गोडाऊनमधुन लोकांना केली जात आहे.अशी माहिती मिळाली.

छापा कारवाईचा थोडक्यात आशय.

दि.19/04/2024 रोजी अपर पोलीस आयुक्त,पिंपरी चिंचवड यांना कंपनीचे ऑपरेशन हेड रेवन नाथ विष्णू केकन यांनी लेखी स्वरुपात कारवाई करणेबाबत त्यांना अर्ज केला होता.सदर अर्जाप्रमाणे क्रांतिवीर नगर,थेरगाव,पुणे यांनी वाकड पोलीस स्टेशन,पिंपरी चिंचवड येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सदर अर्जाप्रमाणे कारवाई करणेबाबत आदेश केल्याने दि. 09/05/2024 रोजी वाकड पोलीस स्टेशन,पिंपरी चिंचवड येथे येवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना केकन भेटले असता,त्यांनी कंपनीच्या मदतीस पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण,वाकड पोलीस ठाणे,पिंपरी चिंचवड यांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने,पोलीस उप निरीक्षक,सचिन चव्हाण यांनी कागदपत्राची पडताळणी केली.त्यानंतर केकन यांनी त्यांना छाप्याचा आशय समजावुन सांगितला.वाकड पोलीस उपनिरीक्षक,सचिन चव्हाण यांनी त्यांच्या स्टाफकरवी, लागलीच दोन इसमाना पंच म्हणुन हजर करण्यास सांगितले.पोलीस उप निरीक्षक,सचिन चव्हाण यांच्या आदेशान्वये त्याच्या स्टाफने दोन पंचास बोलावुन सर्वासमक्ष हजर केले असता,त्यांना करावयाचे छापा कारवाईचा थोडक्यात आशय समजावुन सांगुन पंच म्हणून हजर राहण्याची विनंती केली असता, पंचानी होकार दर्शविल्यानंतर, पोलीस उप निरीक्षक,सचिन चव्हाण यांनी त्यांचा स्टाफ, पोलीस अंमलदार पोहवा. 2924 गिरे, पोहवा. 940 साबळे व पोहवा. 1118 कदम,पंच, तसेच कंपनीचे ऑपरेशन हेड रेवननाथ केकान व त्यांचा सहकारी कमलेश विठ्ठल पायगुडे,वय 42 वर्षे, रा. मु.पो. कुडजे, ता. हवेली, जि.पुणे असे  सर्वजन कंपनीच्या खाजगी वाहनाने 6.30 वा.चे.सुमारास सर्व मिळुन प्रथम क्रांतिवीर नगर,थेरगाव,पुणे येथे व तेथील बिल्डगच्या तळमजल्यावरील गाळ्यामध्ये पोहोचले व तेथील इसमास पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांनी त्यांची व कंपनीची ओळख करुन देवुन त्यांचे व कंपनीचे ओळखपत्र व त्यांच्याकडील कागदपत्रे दाखवुन छाप्याचा आशय समजावून सांगुन कंपनीसमोर गोडाऊन मधील व्यक्तीला त्याचे नाव पत्ता विचारला असता, त्याने त्यांचे नाव गोविंद वनाराम सिरवी,असे असल्याचे सांगितले.त्याच्या गोडाऊन मध्ये जावुन त्याच्या समक्ष पाहणी केली असता ते बनावट होंडा मोटार सायकल अँड स्कुटर इंडिया प्रा.लि.चे पार्टस् मिळुन आल्याने त्याचे वर्णन खालीलप्रमाणे,

बनावट होंडा मोटार सायकल अँड स्कुटर इंडिया प्रा.लि. चे पार्टस् : एकूण 3 लाख 49 हजार 741रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

1) 2,93,728/- रुपये कि. चे एकुण 1072 किट त्यामध्ये प्रत्येकी 11 नग,होंडा कंपनीचे लिंक बुश किट,प्रत्येकी किंमत 274/- रुपये.

2) 3,120/- रुपये कि.चे एकुण 20 नग, होंडा कंपनीचे एअर फिल्टर, प्रत्येकी किंमत 156/- रुपये. 

3) 33,000/- रुपये कि. चे एकुण 500 किट, त्यामध्ये 04 नग, होंडा कंपनीचे डिस्क रबर, प्रत्येकी किंमत 66/- रुपये.

4) 2,080/- रुपये कि. चे एकुण 52 नग, होंडा एक्टिवा मोनोग्राम, प्रत्येकी किंमत 40/- रुपये. 

5) 1,393/- रुपये कि. चे एकुण 199 नग, होंडा कंपनीचे डिस्क पॅड स्टिकर पाऊच व त्यावर एमआरपी स्टिकर असलेले, प्रत्येकी किंमत 7/- रुपये.

6) 420/- रुपये कि.चे एकुण 60 नग, होंडा कंपनीचे लिंक बॉश किट स्टिकर पाऊच व त्यावर एमआरपी स्टिकर असलेले,प्रत्येकी किंमत 7/- रुपये. 7) 16,000/- रुपये किं.ची एक सिलींग मशिन.

3 लाख 49 हजार 741 रूपये  एकूण किंमतीचा मुद्देमाल.

वरीलप्रमाणे सर्व किंमतीचा बनावट मुद्देमाल पोलीस उप निरीक्षक,सचिन चव्हाण यांनी पंचासमक्ष पाहणी करुन वरीलप्रमाणे मुद्देमाल गोण्यात पॅक करुन पंचनाम्याने त्यावर त्यांचे व पंचाचे सहीचे कागदी लेबले लावुन जप्त केले आहे.

ओरीजनल असल्याचे भासवुन ग्राहक व कंपनीची फसवणुक करुन त्याची विक्री.

 दि.09/05/2024 रोजी 6:30 वा.चे सुमारास संजू बारणे यांचे बिल्डगमधील तळमजल्यावरील गाळा, क्रांतिवीर नगर,थेरगाव,पुणे पुणे येथील इसम गोविंद वनाराम सिरवी, वय 30 वर्षे, धंदा व्यापार, रा.हिना हेरिटेज, तिसरा मजला, तापकीर चौक,काळेवाडी,पुणे.मुळ रा. खार्ची, ता.मारवाड, जि. पाली, राज्य राजस्थान याने आपले स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी होंडा मोटार सायकल अँड स्कूटर इंडिया प्रा.लि. कंपनीचे एकुण - 3,49,741/- रुपये किंमतीचे बनावट स्पेअर पार्टस व होंडा नावाचे प्लॅस्टिक स्टिकर पाऊच हे गाळ्यामध्ये विक्रीसाठी ठेवुन ते ओरीजनल असल्याचे भासवुन ग्राहक व कंपनीची फसवणुक करुन त्याची विक्री करीत असताना मिळुन आले म्हणुन त्याचेविरुध्द भा.दं.वि. कलम 420,कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51,63 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top