दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर,दि.23(प्रतिनिधी): करवीर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार पी.एन.पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. तसेच कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले.यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,माजी मंत्री,खासदार,लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्व.आमदार पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले. 

रविवारी घरात पाय घसरुन पडल्याने त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती.यानंतर कोल्हापुरातील ऍस्टर आधार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र आज पहाटे त्यांचे निधन झाले.

त्यांचे मूळ गाव सडोली खालसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मंत्री,खासदार,आमदार,विविध संस्थांचे पदाधिकारी,विविध क्षेत्रातील मान्यवर,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top