जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
कोल्हापूर - दैनिक 'सकाळ' चे मुरगूड प्रतिनिधी प्रकाश तिराळे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेखान जमादार यांनी केलेल्या मारहाणीचे कोल्हापुरात तीव्र पडसाद उमटले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दसरा चौकात उग्र निदर्शने करून पत्रकारांनी राजेखान जमादार यांचा निषेध नोंदवला.
सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दसरा चौकात जमलेल्या पत्रकारांनी जोरदार निदर्शने करत राजेखान जमादार यांना शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून हटवण्याची मागणी केली.राजेखान जमादार यांना अटक करून त्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलतांना सकाळ वृत्तपत्र समूहाचे वृत्तसंपादक तानाजी पोवार यांनी घडलेली घटना निंदनीय असून 'सकाळ' वृत्तपत्रसमूहाने याची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे यांनी झालेल्या घटनेचानिषेध नोंदविताना मुरगूड पोलीस ठाण्याने याबाबत गुन्हा दाखल केल्याबाबत समाधान व्यक्त केले.कोल्हापूर प्रेस चे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकारांना झालेल्या मारहाणीचे प्रकार खपवून घेणार नसल्याचा ईशारा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे,जिल्हा सचिव नवाब शेख,जिल्हा संघटक विनोद नाझरे, जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अनिल पाटील,कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोल्हापूर जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव फराकटे,राज्य मराठी पत्रकार संघाचे शहर संघटक सागर शेरखाने,शहर उपाध्यक्ष फरीद शेख,रोहन भिउंगडे, राधानगरी तालुका उपाध्यक्ष विजय बकरे,सुशांत पोवार, आदम फकीर,एन.एस.पाटील,निरंजन पाटील,अभिजीत हुक्केरीकर,संग्राम काटकर,डॉ.युवराज मोरे,लोकमतचे विश्र्वास पाटील,सकाळचे सुनील पाटील,गौरव डोंगरे, लुमाकांत नलवडे आदी उपस्थित होते.