जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार,सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली " महाराष्ट्र द्वेषी अर्थसंकल्प निषेध आंदोलन" करण्यात आले.यावेळी केंद्र सरकारच्या महाराष्ट्र द्वेषी असणाऱ्या अर्थसंकल्पा विरोधात पक्षाच्या पदाधिकारी यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, सांगली शहराध्यक्ष सागर घोडके,
धनपाल खोत,उत्तम कांबळे ,तानाजी गडदे,ज्योती अदाटे, छाया जाधव ,अनिता पांगम ,डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे,फिरोज मुल्ला,जुबेर चौधरी,चंद्रकांत नाईक,संगिता जाधव,आशा पाटील,वैशाली धुमाळ,छाया पांढरे,सुरेखा सातपुते,सुरेखा हेगडे,प्रियांका तुपलोंढे, प्रणवी पाटील,सोमनाथ सूर्यवंशी,बालम मुजावर,शितल खाडे, सूरज देसाई व राहुल यमगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.