जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
यमगर्णी ता.निपाणी येथुन आषाढी वारीसाठी पंढरपूरला पायी वारी गेली होती.या वारीमधुन श्री.ज्ञानदेव कूंभार हे गेले होते. त्यांच्या मागे त्यांचा पाळीव श्वान (कुत्रा)पाठीलागुन गेला होता.तो रोज दिंडीसोबत चालत राहिला.असे तो 18 जुलै पर्यंत यमगर्णीवासीयांच्या दिंडी सोबत मुक्कामास राहिला.
व्दादशीला पंढरपुरहुन दिंडीचे यमगर्णीकडे आगमन होणार असल्याने सर्व वारकरी परतीच्या तयारीस लागलें,परतीचा प्रवास वहानातुन होता. त्यामूळे कुत्र्यासही वहानात घेण्याचा सर्वांचा विचार केला होता.पण पंढरपुरात यात्रेच्या गर्दीत तो चुकला.सर्व वारकर्यानी प्रयत्न करुनही तो कुत्रा सापडला नाही.त्यानी त्याला तेथेच सोडुन यमगर्णी कडे प्रयान केले.
मालकासह सर्व वारकर्याना वाटले की हा कुत्रा पंढपुरमधेच राहीला,पण काल अचानक हा कुत्रा,पायी प्रवास करत पंढरपुर हुन यमगर्णी गावात दाखल झाला.गावात आल्यावर सर्वानी आश्चर्य व्यक्त केले.यावेळी श्वान प्रेमी मा.श्री.कोरे मालक यांच्या मार्दर्शनाखाली त्याची विठ्ठल मंदिरापासुन ते श्री.एकनाथ कुंभार यांच्या घरापर्यंत मिरवनणूक काढुन स्वागत केले.एका कुत्र्याने पंढरीची येता-जाता पायी वारी केली. या घडलेल्या आश्चर्यकारक घटनेची या भागात चर्चा होत असून हा एक कुतुलाचा विषय झाला आहे.
यमगर्णी व परीसरातील लोक या कुत्र्यास विठ्ठल-रखुमाईनेच रस्ता दाखवत गावात पोहच केले असे बोलत आहेत.तसेच परिसरातील लोक त्याला पहाण्यास व बरोबर येताना खाऊ घेऊन येत आहेत.